अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील राज्य महामार्ग क्रमांक २८४ वरील बाभुळगाव आलेगाव या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अंबाशी येथील गतीरोधक, बाभुळगाव चौकातील मोठे खड्डे तसेच उंबरवाडी चौफुलीवरील पुलाबाबत वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ता निलेश कापकर यांनी केला आहे.