पिंपळनेरी येथील एका इसमाने स्वतःच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी ५:३० वाजता घडली. विनोद जांभुळे (४५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विनोद जांभुळे यांना दारूचे व्यसन होते. पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचा. शुक्रवारी पत्नी चिमुरात आठवडी बाजारात तर मुलगा शाळेत गेला. यावेळी घरी कुणीही नव्हते. आठवीत शिकणारा मुलगा सायंकाळी ५:३० वाजता घरी आल्यानंतर वडील मृतावस्थेत आढळल्याचे पाहून घाबरला. त्याने आजी-आजोबांना कळविले.