सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भद्रावती नगरपरीषद निवडणुकिचा निकाल २१ डिसेंबर ला जाहीर करण्यात येणार असुन यादरम्यान इव्हिएम मशीन ठेवण्यात आलेली औद्योगीक प्रशिक्षण संस्थेची स्ट्रांगरुम पुरेशा सुरक्षा व्यवस्थेत असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी दिली आहे. सुरक्षेसाठी स्ट्रॉंगरुम समोर व परीसरात एसआरपीएफ व पोलीस तैनात करण्यात आले असुन परीसरात सर्वत्र सीसीटिव्ही कैमेरे लावण्यात आले असल्याची माहिती शेळकी यांनी दिली आहे.