माढा: आईच्या देखभालीहून परतताना भीषण अपघात; तरुण व्यावसायिकावर काळाने झडप घातली; परिते आरोग्य केंद्रासमोरील घटना
Madha, Solapur | Oct 6, 2025 माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहरातील राज प्लंबिंग या दुकानाचे मालक अरुण नारायण जाधव वय ३५ यांचा शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ही दुर्घटना टेंभुर्णी–पंढरपूर रस्त्यावरील परिते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर घडली.मिळालेल्या माहितीनुसार, जाधव हे दिवसभर करकंब येथील आपल्या दुकानात काम करून संध्याकाळी टेंभुर्णीकडे परतत होते. यावेळी त्यांची दुचाकी अचानक घसरली आणि ते रस्त्याच्या कडेला पडले. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.