जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या बुधवार, दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. मंगळवार दि. 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कामगार व कर्मचार्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश लागू राहणार आहेत. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदार असलेल्या कामगारांना मतदानासाठी आवश्यक वेळ व सुट्टी देणे सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्या, औद्योगिक उपक्रम बंद राहतील.