नांदुरा: तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पूनम थोरात एसीबीच्या जाळ्यात
नांदुरा तहसील कार्यालयातील येथील पुरवठा निरिक्षक पुनम थोरात यांना १६ हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. राशनच्या दुकानावरील कारवाई थांबविण्यासाठी नांदुरा शहरातील एका राशन दुकानदारकडे लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्यात काही तडजोड झाली आणि १६ हजार रूपये लाच देण्याचे ठरले. एसीबीच्या पथकाने आज १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३–४ वाजताच्या सुमारास सापळा रचून पुरवठा निरिक्षक पुनम थोरात यांना १६ हजार रूपयांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.