जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय पाणीपुरवठा कामांच्या नावाखाली खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवार दि. 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पांगरकर नगर, अंबड रोड, जालना येथील शासकीय ठेकेदार संभाजी भाऊसाहेब सिरसाठ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रऊफ नायजु पटेल, रा. शिवाजी नगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर याने चौकशी लावण्याची धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी करून तब्बल 15 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.