कुंभिटोला येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजप्रबोधन होते, नव्या पिढीला संस्कृतीची ओळख मिळते आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत होतो असे मत याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले. मंडई निमित्त आयोजित करण्यात आलेले हे नाटक ग्रामीण भागातील कला व संस्कृती जपण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.