मेहकर: मेहकर-सुलतानपूर रस्त्यावर भीषण अपघात; १५ वर्षीय युवकाचा ट्रकखाली येऊन मृत्यू
सुलतानपूर रस्त्यावरील धाब्याजवळ सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मेहकरमधील १५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माहितीनुसार, राहील खान (वय १५, रा. मिलिंद नगर, मेहकर) आपल्या मित्रासह मोटारसायकल क्रमांक एमएच १२ एजी २६२९ वरून शहराकडे येत होता. मार्गात रस्त्यावरील खोल खड्यात दुचाकी अडकल्याने दोनही युवक खाली पडले.