साकोली: सानगडी परिसरात बिबट्याचे दर्शन,झाडगाव केसलवाडा पापडा परिसरात भीतीचे वातावरण,वनविभागाने गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी
साकोली तालुक्यातील सानगडी परिसरात गुरुवार दि.13 नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता सानगडी ते नवेगाव रोडवर बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन होताच नागरिकांनी बिबट्याला मोबाईलच्या कॅमेरा बंद केले आहे त्यामुळे झाडगाव केसरवाडा पापडा खुर्द परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सानगडी उपवन क्षेत्रात वनविभागाने गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे