बुलढाणा: पत्रकार भवनात राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा,पत्रकारांचा लवकरच ‘अभ्यास दौरा'
भारतीय प्रेसच्या स्वातंत्र्याचा आणि जबाबदारीचा सन्मान करण्यासाठी साजरा होणारा राष्ट्रीय पत्रकार दिन बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे रविवार आज उत्साहात पार पडला. याप्रसंगी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर,तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.पत्रकारीतेत डिजीटल क्रांती झाली त्यामुळे,दिल्ली,मुंबई यासारख्या मोठ्या शहरातून होणाऱ्या माध्यमांच्या कामकाजाचा अभ्यासाठी दौरा करू,अशी घोषणा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी केली.