अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांनी अवघ्या १२ तासांत बकरी चोरी प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी व त्यांच्या शेजाऱ्यांच्या तीन बकऱ्या चारण्यासाठी सोडल्यानंतर परत न आल्याने चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीच्या आधारे मोहम्मद शाबाज मोहम्मद आरिफ व अफजल खान अब्दुल खलील खान यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून २८ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.