अंबड–जालना रोडवर अपघात; शाळेत जाणारा चिमुकला जखमी अंबड: वाघलखेडा (ता. अंबड, जि. जालना) येथील रहिवासी श्री. शिवप्रसाद रामकिसन घुगे हे दुचाकीवरून आपल्या चिमुकल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना अंबड–जालना रोडवर फेडरेशन कार्यालयाजवळ अपघात झाला. ही घटना आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. अपघातात श्री. घुगे यांच्या गुडघ्याला मार लागला, तर दुचाकीवर बसलेला शाळेत जाणारा चिमुकला देखील जखमी झाला आहे. अपघातानंतर नातेवाईकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने अंबड येथील उपजिल्हा रु