बार्शी: भगवती देवी यात्रेत डीजे-लेजरचा गोंधळ; वैराग पोलिसात २५ जणांवर कारवाई
वैराग पोलिस ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी १३ जणांसह १२ बेंजो चालकांवर ३ ऑक्टोबर रात्री दहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील तडवळे येथे भगवती देवी यात्रेनिमित्त आयोजीत मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या डीजे, डॉल्बी व लेझर लाईट वापरास मनाई आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. बापू लोखंडे, बजरंग शिरसट, शैलेश भाकवडे, बाळासाहेब आवारे, किरण जाधव आदींसह बारा बेंजो मालकांनी नियमभंग करत मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट वापरून अश्लील गाणी वाजवली.