आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील रफिक कॉलनी परिसरात असलेल्या नाल्यावर बांधकाम करण्यात आले असल्याचे पाहायला मिळाले असून याकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे,कारण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नाल्यांनी वाहणाऱ्या पुराचे पाणी ही रफिक कॉलनी परिसरातील रहिवाशांच्या घरात घुसणार आहे, त्यामुळे त्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागणार असून याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन दखल घ्यावी अशी मागणी सध्या होत आहे.