सांगोला: हात धरून अश्लील वर्तन, धमकीही दिली; सांगोला पोलिसात फिर्याद
विवाहित महिलेच्या हाताला धरून 'तू मला आवडतेस, माझ्याबरोबर चल,' असे म्हणून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास सांगोल्यात घडली. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जमीर समीर मुलानी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला..पीडिता घरासमोर असताना जमीर याने तिला पाहून इशारा करत जवळ येऊन 'तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत चल,' असे म्हणून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.