मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सासोली -हेदुस शाळेत प्रारंभ
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सासोली -हेदुस शाळेत दोडामार्ग पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला. यावेळी सरपंच बळीराम शेटये, व्हाइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष भूषण सावंत, मुख्याध्यापक संदिप सावंत, अंगणवाडी सेविका सरिता धाऊसकर उपस्थित होते.