वर्धा: स्वालंबी क्रीडांगणावर १०वर्षांच्या जीवाची हत्या!झाड गेले,सावली गेली!वर्धा महोत्सवच्या तयरीने खेळाडूंच्या भावना दुखावल्या
Wardha, Wardha | Nov 20, 2025 वर्धा शहरात लवकरच वर्धा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे आणि टेन्ट व स्टॉल्स उभारण्याचे काम स्वालंबिक शाळेच्या क्रीडांगण ग्राउंडवर सुरू आहे. मात्र, याच तयारी दरम्यान एक अत्यंत धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार, आयोजकांच्या "लापरवाहीमुळे" या ग्राउंडवर असलेले दहा वर्ष जुने आणि खेळाडूंना सावलीची छाया देणारे एक मोठे झाड तोडण्यात आले आहे.