कन्नड तालुक्यातील नागद सर्कलसाठी विकासमहर्षी रायभान जाधव विकास आघाडीने विष्णु राठोड यांची उमेदवारी जाहीर केली आहे.माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि. २० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता नागद सर्कलची उमेदवारी अधिकृतपणे घोषित केली.या उमेदवारीला ‘A B’ देत आघाडीने निवडणुकीची रणनीती स्पष्ट केली आहे.रायभान जाधव विकास आघाडीचा हा तिसरा उमेदवार असल्याची माहिती देण्यात आली.या घोषणेमुळे नागद सर्कलमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.