इंदापूर: सरडेवाडी टोलनाक्यावर मांगुर माशांची बेकायदेशीर तस्करी उघड - लाखोंचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांच्या ताब्यात..
Indapur, Pune | Nov 22, 2025 इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाक्यावर बेकायदेशीर पद्धतीने मांगुर माशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या दोघांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा संशयित वाहन अडवून तपास केला असता, प्रतिबंधित मांगुर माशांचा मोठा साठा आढळून आला.