म.रा. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे संचालित बारावी वर्गाची बोर्ड परीक्षा मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता पासून सुरू झाली. परीक्षार्थी, विद्यार्थी, पालकांची मंगळवार ला सकाळपासूनच लगबग बघावयास मिळाली. पहिला पेपर असल्याने विद्यार्थी, पालक सकाळी अर्धा तास आधीच विविध परीक्षा केंद्रांवर पोहोचले. केंद्र अधिकारी, प्राचार्य,शिक्षकातर्फे उपस्थित विद्यार्थ्यांना काही सूचना करण्यात आल्या रामटेका तालुक्यात 2900 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.