शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावर मांडल शिवारात देशमुख मंगळ कार्यालय परिसरात अज्ञात चोरट्याने घराच्या कंपाऊंडमधून पोलिसाची दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मारवाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या भरत श्रीराम इशी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोहेकॉ पिबी नंदाळे करीत आहे.