आर्णी: विठोली येथे श्री दत्त जयंतीनिमित्त आजपासून संगीतमय भागवत सप्ताह
Arni, Yavatmal | Nov 27, 2025 तालुक्यातील विठोली येथे श्री दत्त जयंतीनिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत सप्ताहाचा भक्तीमय कार्यक्रम २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. सलग २६ वर्षांची या सप्ताहाला परंपरा आहे. हा सप्ताह भक्ती, ज्ञान आणि सत्संगाच्या रंगात रंगून जाणार आहे. सप्ताहाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कथा वाचक मुक्ताश्री दीदी (पंढरपूरकर) ह्या आपल्या प्रभावी वाणीत भागवत कथा दररोज सकाळी ९ ते १२ प्रथम सत्र व द्वितीय सत्र ३ ते ५ वाजेपर्यंत भाविकांना अध्यात्मिक अनुभव देणार आहेत. आठदिवस चालणाऱ्या या धार्मिक