राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाजीराव धर्माधिकारी यांनी दीपक देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “दीपक देशमुख मुळेच मुंडे परिवारात फूट पडली,” असा गंभीर आरोप करत त्यांनी देशमुख यांच्यावर घणाघाती टीका केली. बाजीराव धर्माधिकारी म्हणाले, “हा व्यक्ती तब्बल पंचवीस वर्षे आमच्यासोबत राहिला. सर्वात जास्त लाभ त्याने आमच्याकडून घेतले. त्याला तिकीट मिळाले आणि एका मिनिटात तो दुसऱ्या गटात गेला. इतकेच नाही तर आमची माणसे फोडण्याचे काम त्याने केले. त