आर्णी: अवैध रेती तस्करी करणाऱ्या 3 ट्रॅक्टर वर महसूलची कारवाई ; पहूर व केळझरा येथे सुरू होती तस्करी
Arni, Yavatmal | Nov 20, 2025 आर्णी तालुक्यात अवैध रेती तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने धडाकेबाज मोहीम राबवत एका दिवसात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई करून मोठा दणका दिला आहे. तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 20 नोव्हेंबर ला सकाळी 8 वाजता पहूर नस्करी येथून 1 आणि केळझरा कोमटी येथे दुपारी 1 वाजताच्या दरम्यान 2 ट्रॅक्टरवर कारवाई करत मोहीम राबवण्यात आली. सदर तिन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन त्यांना आर्णी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाई तहस