निफाड: अंगणवाडी केंद्रांवर चोरट्यांचे धाड — तांदूळ, साखर, गोडतेल, वजनकाटा, टीव्ही व सिलेंडर लंपस
Niphad, Nashik | Nov 28, 2025 अंगणवाडी केंद्रांवर चोरट्यांचे धाड — तांदूळ, साखर, गोडतेल, वजनकाटा, टीव्ही व सिलेंडर लंपास जनार्दन स्वामी मंदिरात कडी–कोयंडा तोडण्याचा प्रयत्न; निलख वस्तीमध्ये सलग तिसरी चोरी देवगाव : देवगाव येथील परिसरात चोरट्यांनी रात्री चोऱ्या करत मंदिर व अंगणवाड्यांवर धाड टाकली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षा यंत्रणेवर तिखट प्रश्न उपस्थित केले आहेत.