चाळीसगाव: चाळीसगावच्या जामदा धरणातून वाळू तस्करीचा गंभीर प्रकार; महसूल पथकांवरच 'अर्थपूर्ण' गैरव्यवहाराचे थेट आरोप
चाळीसगाव तालुक्यातील जामदा धरणातून दररोज रात्रीच्या वेळी यंत्रांच्या (मशिनरी) सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा (Sand Mining) आणि त्याची तस्करी सुरू असल्याचा एक अतिगंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेपेक्षाही अधिक चिंताजनक बाब म्हणजे, या वाळू चोरीला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नेमलेले महसूल पथकांचे अधिकारी व कर्मचारीच या वाळू तस्करांना अभय देत असून, त्यांच्यावर 'अर्थपूर्ण' व्यवहार केल्याचा आणि मोठ्या रक्कमेचे हप्ते स्वीकारल्याचा थेट आरोप होत आहे