बुलढाणा: मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी धडकले बुलढाणा येथील कृषी कार्यालयात,पीक विमा मिळाला नसल्याचं आरोप
मलकापूर तालुक्यातील हजारो शेतकरी वर्ष 2023- 24 च्या पिक विमा पासून वंचित आहे.या संदर्भात त्यांनी अनेक वेळा संबंधित विमा कंपनी आणि कृषी विभागाशी संपर्क साधला परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आज 25 नोव्हेंबर रोजी दुपारी शेकडो शेतकऱ्यांनी बुलढाणा येथील कृषी अधीक्षक कार्यालयात धडक देत तात्काळ पिक विमा देण्याची मागणी केली आहे.