धुळे: धुळे निवडणुकीसाठी 'खाकी' सज्ज; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निवडणुकी संदर्भात माध्यमांशी साधला संवाद
Dhule, Dhule | Nov 28, 2025 धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी वाढत असून, २ डिसेंबरच्या मतदानासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबईची विशेष तुकडी, एसआरपीएफच्या दोन प्लाटून आणि ४०० होमगार्ड्स तैनात केले जातील. बंदोबस्तासोबतच अवैध धंद्यांवर कारवाई आणि ‘रूट मार्च’द्वारे मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.