आज ३ नोव्हेंबर सोमवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता धामणगांव रेल्वे तालुक्यातील गिरोली गावात कार्तिक एकादशी पालखी व दहीहंडी सोहळा संपन्न झाला. यावेळी गिरोली गावातील लहान बालगोपालांनी वेगवेगळी वेशभूषा केली होती. संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली व नंतर हनुमान मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली यावेळी गावातील असंख्य बालगोपाल, महिला, पुरुष बहुसंख्य उपस्थित होते.