चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी शांततेत मतदान पार पडले. संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत लोकशाहीचे अत्यंत सुंदर आणि आदर्श चित्र पाहायला मिळाले. निवडणुकीत थेट एकमेकींविरोधात उभ्या असलेल्या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार, भारतीय जनता पक्षाच्या सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण आणि शहर विकास आघाडीच्या श्रीमती पद्मजा राजीव देशमुख, या दोघींची मतदान केंद्रावर झालेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.