आज दि 1 0 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या सत्तेची अधिकृत स्थापना करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे समीर राजूरकर यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला, तर शिवसेना पक्षाचे राजेंद्र रंजाळे यांनी उपमहापौर म्हणून पदभार स्विकारला. यावेळी दोन्ही पक्षांचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवकही सभागृहात उपस्थित राहून या प्रक्रियेला साक्षीदार ठरले.