अकोला जिल्ह्याच्या केळीवेळी येथे आज शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने कारवाई केली. दरम्यान, MH-28-BB-4489 हे वाहन एक ब्रास वाळू घेऊन जात असताना ग्राम महसूल अधिकारी महेश सरकटे यांनी ही कारवाई केली. संबंधित वाळू करोडी फाटा येथून रॉयल्टीशिवाय अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती ग्राम महसूल मित्रांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ ही माहिती ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.