खामगाव शहरातील बाळापुर फैल भागातील रहिवासी रोहन संजय बामनेट (२२) याचेविरूध्द उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव क्र. १४/२०२५ कलम ५६ (१) (अ) (ब) मपोका नुसार पाठविण्यात आला होता. सदर प्रस्ताव मंजुर होऊन हद्दपारीचा आदेश प्राप्त झाल्याने शहर पोलिसांनी रोहन बामनेट याला ३ महिन्याकरीता बुलढाणा जिल्ल्ह्यातुन हद्दपार करीत अकोला जिल्ह्यात सोडण्यात आले आहे.