शाहूवाडी: धोपेश्वर फाटा येथे मीन लाईनवर काम करताना विजेचा धक्का लागल्याने 22 वर्षीय तरुण सहाय्यक वायरमेनचा दुर्दैवी मृत्यू
शाहूवाडी तालुक्यातील वालूर गावाजवळ धोपेश्वर फाटा येथे मेन लाईनवर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा तीव्र शॉक बसून गणेश पाटील या वारूळ येथील रहिवासी असलेल्या अवघ्या 22 वर्षीय तरुण सहाय्यक वायरमनचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवार २२ जुलै रोजी दुपारी सुमारे १ वाजता घडली. आज दुपारच्या दरम्यान गणेश पाटील हे धोपेश्वर फाटा येथे लाईनमन म्हणून काम करत होते. काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्यांना जोरदार शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.