देवळी: मारुती चितमपल्ली, डॉ. सालीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य! पक्षी सप्ताह उत्साहात पार पडला; सालोड हिरापूर येथे समारोप
Deoli, Wardha | Nov 12, 2025 निसर्गाप्रती जागरूकता निर्माण करणाऱ्या पक्षी सप्ताहाचा आज समारोप कार्यक्रम बहार नेचर फाउंडेशनने आयोजित केलेल्या या सप्ताहाचा समारंभ आज, बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सालोड हिरापूर येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाच्या वनौषधी उद्यानात पार पडला आहे.या कार्यक्रमाला जिल्ह्याचे उपवनसंरक्षक हरवीर सिंह, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भरत राठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते असे आज रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे