भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवतावादी विचारवंत व समाजक्रांतिकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहुरी फॅक्टरी परिसरात आदरांजली अर्पण करून त्यांचे कार्य व विचारांचे स्मरण करण्यात आले. प्रसादनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.