बुलढाणा: नगराध्यक्षसाठी 1 तर सदस्य पदासाठी 66 अर्ज अवैध,निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांची माहिती
नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळ सुरू असून काल शेवटच्या दिवशी बुलढाणा नगरपालिकेत अध्यक्षपदासाठी 13 तर सदस्य पदासाठी 248 अर्ज प्राप्त झाले होते. आज 18 नोव्हेंबर रोजी बुलढाणा नगरपालिकेत प्राप्त अर्जांची तपासणी करण्यात आली त्यात नगराध्यक्ष पदासाठी प्राप्त 13 अर्ज पैकी 1 अर्ज अवैध ठरविण्यात आला असून 8 जणांचे 12 अर्ज वैध आहे.तर सदस्य पदासाठी प्राप्त 248 अर्जापैकी 66 अर्ज अवैध झाले असून 182 अर्ज वैध असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी आज रात्री दिली आहे.