बुलढाणा: आता बिहारच्या मुख्यमंत्र्यालाही "चोमु" म्हणावा लागेल!हर्षवर्धन सपकाळ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
बिहार निवडणुकीत मतदार यादीचा घोळ आणि मत चोरीचा मुद्दा कायम आहे.70 लाख मतदार वगळणे आणि तितकेच मतदार वाढवण्याचे जे आरोप आहे त्याची शहनिशा झाली नाही.त्यामुळे या निकाला नैतिक दृष्टीने मान्य करणे अवघड आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही "चोमू" मुख्यमंत्री म्हणतात,म्हणजे मत चोरी करून झालेले मुख्यमंत्री, तसंच आता बिहारचे मुख्यमंत्र्यालाही "चोमू" म्हणावा लागेल,अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज 16 नोव्हेंबर रोजी दुपारी दिली आहे.