सातगाव येथील बेपत्ता व्यक्ती, वसंता रामाजी नेवारे यांच्या खून प्रकरणाचा बुटीबोरी पोलिसांनी छडा लावला आहे. दारू पिण्यावरून झालेल्या वादातून हा खून करण्यात आला असून पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे.वसंता नेवारे हे ९ जानेवारीपासून बेपत्ता होते. तपासादरम्यान, १५ जानेवारी रोजी त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.