जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. रविवार दि. 11 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता महापालिका निवडणूक माध्यम कक्षाकडून ही माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी शहरातील प्राथमिक शाळा, नूतन वसाहत, ऑक्सफर्ड स्कूल,व्ही.एस.एस.कॉलेज,आर.एच. व्ही. हिंदी विद्यालय, सी. एस.एम. के.विद्यालय तसेच सेंट मेरी स्कूल अशा 06 ठिकाणी असलेल्या 40 मतदान केंद्रांची पाहणी केली.