अकोला जिल्ह्यातील खरप बु. ते घुसर रोडवर आज सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास MH 28 AB 9150 क्रमांकाच्या मालवाहक ४०७चा भीषण अपघात झाला. या अपघातात मजुरीसाठी राज्यबाहेरून आलेल्या मजुरांना मोठा फटका बसला असून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर १० ते १२ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मध्यप्रदेशातील बराणपूर जिल्ह्यातील कालापाड तालुका खकणार येथील मुन्नीबाई जांभेकर (वय ४९) आणि मनीष कासदेकर (वय ३७) यांचा अपघातात जागेवरच मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी आहेत.