चाळीसगाव: तरवाडे येथून शाळकरी विद्यार्थिनी बेपत्ता; पोलीस, ग्रामस्थ आणि आमदार तपासकार्यात
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकणारी कुमारी धनश्री उमेश पाटील शाळा सुटल्यानंतर बेपत्ता झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस आणि ग्रामस्थांकडून धनश्रीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.