आर्णी: तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस पकडण्यास शेवटी आर्णी पोलिसांना आली यश
Arni, Yavatmal | Nov 21, 2025 आर्णी पोलिस स्टेशन हद्दीतील तीन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल तीन वर्षे पसार असलेला आरोपी देवादास राठोड (वय 27) याला अखेर आर्णी पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले. पोलिसांनी ही कारवाई 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी केली. 2023 सालातील गु क्र. 33/23, 34/23 आणि 42/23 या प्रकरणांत आरोपीवर कलम 454, 380, 411, 34 भा.दं.वि. तसेच गैर-व्यवहार, घरफोडी, चोरी यांसारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल होते. गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी अनेक वेळा शोध घेऊनही तो हाती लागत नव्हता.