शहरातील गणेश दत्त गुरुपंचायतन मंदिरात आजपासून श्री दत्तजयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे.यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी श्री दत्तयाग,दुपारी ११ ते १२ दरम्यान श्री दत्त जन्म सोहळा, श्री दत्त जन्म किर्तन आदी कार्यक्रमांचा सहभाग आहे. याशिवाय सायंकाळी ५ वाजता श्री दत्त पालकीची शहरातील प्रमुख रस्यांवरुन शोभायात्रा काढण्यात येणार आहे.