चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे सुमारे ३०० वर्षांची गौरवशाली परंपरा असलेला एकमुखी दत्त यात्रोत्सव आज, गुरुवार ४ डिसेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. यात्रेनिमित्त ग्रामस्थ आणि मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार ५ डिसेंबर रोजी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या आखाड्यात अनेक नामवंत पहिलवान सहभागी होणार असून, विजेत्यांना हजारो रुपयांची बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे.