तेल्हारा: बेलखेड येथे शंकर पटाचे उत्साहात आयोजन
Telhara, Akola | Apr 1, 2024 बेलखेड येथे जय हनुमान बैलगाडा मंडळाच्या वतीने भव्य शंकर पटाचे आयोजन आज दुपारी तीन वाजता करण्यात आले स्वर्गीय लिलाबाई टोहरे यांच्या शेतात शंकरपटाचे आयोजन करण्यात आले यामध्ये सोमठाणा येथील सरदार बादल व चांदोळच्या लाख्या या बैलाने बाजी मारली यावेळी शंकर पटात एक लाख 55 हजार रुपयांची जंगी लूट करण्यात आली होती हि स्पर्धा अ आणि ब गटात पार पडली स्पर्धेच्या यशस्वीसाठी दिलीप वानखडे विक्रांत नागपुरे गोपाल राऊत प्रमोद अरुडकार गोपालसिंग मलीये संजय भोपळे राजू इंगळे आदींनी परिश्रम घेतले