मुक्ताईनगर येथील आदिशक्ती संत मुक्ताई मंदिराचे काम अपुर्णावस्थेत आहे. २५ कोटींचा निधी मंजूर असतांना आतापर्यंत केवळ ९ कोटींचा निधी प्राप्त झाल्याने मंदीराचे काम अपुर्णावस्थेत आहे. यासंदर्भात आ. एकनाथराव खडसे यांनी हिवाळी अधिवेशनातमंगळवारी 9 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मंदीराचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्यासाठी सुधारित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.