छत्रपती संभाजीनगर : शहरातील भीमनगर भवसिंगपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक 19 वर्षीय तरुण हातात धारदार चाकू आणि तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने या तक्रारीकडे पोलिसांनी गंभीरतेने पाहिले.