बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. नागझरी नदीच्या बंधाऱ्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवताना अरुण उर्फ डेव्हिड बनसोडे (रा. कल्याणनगर, आसरा, सोलापूर) यांनी जीवाची बाजी लावली. मुलगा अनुग्रहला सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांनी यश मिळवले, मात्र स्वतः भोवऱ्यात अडकून बुडाले. रुग्णालयात नेल्यावर उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. अनुग्रहची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्याला सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात हलवले आहे.